गेल्या काही महिन्यांमध्ये जगात कुठे ना कुठे सतत ज्वालामुखीचे उद्रेक होत आहेत... रशियातही गेले काही वर्ष निद्रिस्त असलेला कामच्तकामधील ज्वालामुखी जुलै महिन्यात सक्रीय झाला... इंडोनेशियातील मारापी ज्वालामुखी, जपानमधील ज्वालामुखींचे तर उद्रेक होतच असतात. मात्र आता अचानक भारतातील एका ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. अंदमान निकोबारमधील बॅरन बेटावरील हा ज्वालामुखी सक्रीय झालाय. गेल्या आठ दिवसांत दोनदा ज्वालामुखीचा स्फोट झाला. त्यातून लाव्हाही बाहेर पडताना दिसतोय. २०२२नंतर पहिल्यांदाच ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. काय घडतंय भारताजवळच्या भूगर्भात, भारताच्या मुख्यभूमीला काही धोका आहे का पाहूया एक रिपोर्ट....