२३ दिवस झाले... पश्चिम आशियातील युद्ध काही थांबता थांबेना...फक्त दोन-तीन दिवसांत इराणला नमवू म्हणणारे ट्रम्पही आता इराणच्या कडव्या प्रतिकारानं पुरते वैतागल्याचं दिसतंय. कारण ट्रम्प यांनी इराणला दोन सेकंदांत संपवण्याचा इशारा देऊन टाकलाय. ते असं बोलले त्यावेळी त्यांच्या बाजूला कोण बसलं होतं तर जपानचे पंतप्रधान... त्यांच्या समोरच ट्रम्पनी इराणला ही धमकी देऊन टाकली...केवळ दोन सेकंदांत कसा विध्वंस होऊ शकतो हे जपानशिवाय आणखी कोणत्या देशाला कळणार.... पाहूया ट्रम्प यांनी नेमकी काय धमकी दिली आहे आणि खरंच जे इतिहासात जपानचं झालं ते पुढे इराणचं होणार का....