SpiceJet Flight Delay | मुंबईत स्पाईसजेटचा ढिसाळ कारभार, मुंबई विमानतळावर शेकडो प्रवासी अडकले

मुंबई विमानतळावर स्पाईसजेटच्या ढिसाळ कारभाराचा फटका शेकडो प्रवाशांना बसत आहे. संध्याकाळी सातनंतर स्पाईसजेटच्या एकाही विमानाने टेकऑफ घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक उड्डाणे उशिराने सुरू असून शेकडो प्रवासी विमानतळावर अडकून पडले आहेत. विशेष म्हणजे रात्री साडेअकराच्या विमानासाठी अद्याप बोर्डिंगही सुरू झालेली नसल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. स्पाईसजेट आणि विमानतळ प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

संबंधित व्हिडीओ