सुका चारा 12 रुपये, मुरघास 8 रुपये प्रति किलो दर, दुष्काळग्रस्तांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पशुपालकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतलाय.. चारा टंचाईच्या परिस्थितीत मुरघास आणि सुक्या चाऱ्याचे कमाल दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार सुका चारा 12 रुपये, तर मुरघास 8 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केला जाणार आहे. ज्वारी आणि बाजरीच्या चाऱ्याला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून वाहतूक खर्चासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ