छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा हा प्रकार आहे... एनसीईआरटीने हा प्रकार थांबवला नाही,तर त्यांचे खांडोळे केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा छत्रपती कल्पनाराजे भोसलेंनी दिलाय... एनसीईआरटीकडून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये सर्वपक्षीय मराठी सन्मान मोर्चा काढण्यात आला होता.. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं..