Heatwave : दिवसाच नाही तर रात्रीही होणार लाही-लाही!

वातावरणात उष्णता (Heatwave) वाढल्याने अंगाची लाही होतीये. पुढचे काही दिवस अशा पद्धतीने उकाडा वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं (IMD) व्यक्त केलाय.  येणाऱ्या दिवसात कमाल तापमान तर, वाढणारच आहे शिवाय रात्री किमान तापमानही जास्तच असेल. त्यामुळे रात्रही दिवसाप्रमाणेच अंगाची लाही करणारी असेल. त्याचबरोबर उष्णतेची लाट येण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या तज्ज्ञ सुषमा नायर यांनी व्यक्त केलाय.
 

संबंधित व्हिडीओ