मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. सुनेत्रा पवार यांनी सोमवारी कोअर टीमची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सतीश चव्हाण यांच्या पराभवाची कारणमीमांसा केली जाणार असल्याची माहिती आहे.