अजित पवारांच्या अकाली निधनाचा संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. यातून आता पवार कुटुंबासह महाराष्ट्र हळूहळू सावरत आहे. अजित दादांच्या मृत्यूनंतर तिसऱ्याच दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अवघ्या ७२ तासांत अशाप्रकारे शपथविधी झाल्याने सुनेत्रा पवारांवर काहींनी टीका केली. शपथविधी घ्यायला इतकी घाई का केली? किमान १३ दिवस थांबायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया जनतेतून समोर आली. तर काहींनी सुनेत्रा पवारांच्या भूमिकेचं समर्थन केलं. दरम्यान आज पहिल्यांदाच सुनेत्रा पवारांनी यावर भाष्य केले आहे. सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदाच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.