बीड सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर टीका करणारे सुरेश धस यांची मुंडेंसोबतच्या भेटीची बातमी बाहेर आली आणि संपूर्ण राजकारण ढवळून निघालं होतं. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्यासमोरच दोघांची भेट झाल्याचं म्हटलं होतं. याच बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धस यांनी आक्षेप घेतलाय. मुंडेंसोबत माझी फक्त 20 ते 25 मिनिटं भेट झाली मग साडेचार तास भेट झाली हे का सांगितलं त्यांना मी विचारणार असं धस म्हणालेत. तर माझ्याबद्दल कोणी षडयंत्र रचलं हे मला माहित असून मी मुख्यमंत्र्याच्या कानावर घालणार असल्याचं धस म्हणालेत.