आघाडीच्या महिला शिष्टमंडळानं राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. यात रोहिणी खडसे, सुषमा अंधारे यांचा समावेश होता. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाखणकरांच्या राजीनाम्यासाठी राज्यपालांची भेट घेण्यात आली. रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष असूनही त्या आयोगाला पूर्ण वेळ देत नाहीत असा आरोप या शिष्टमंडळानं केलाय.