Rahul Narvekar यांना निलंबित करुन गुन्हा दाखल करा; Uddhav Thackeray यांची मोठी मागणी | NDTV मराठी

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करुन केली. आपल्या देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरु झाल्यासारखे वातावरण आहे. आम्ही त्यांची मतचोरी पकडल्यावर त्यांनी आमच्या उमेदवारांची पळवापळवी सुरु केलीय.... बिनविरोध उमेदवार निवडून येणे, हा लोकशाहीचा अपमान आहे. भाजपचा राहुल नार्वेकर हा आमदार विरोधी पक्षाच्या उमेदवारांना दमदाटी करतो. त्यांचा अधिकार विधानसभेत आहे, बाहेर ते एक आमदार आहेत. ते विरोधी पक्षाच्या उमेदवारांना दमदाटी करतात. हे विधानसभा अध्यक्षपदाच्या प्रतिमेला छेद देणारे वक्तव्य आहे. ते नायक चित्रपटातील अनिल कपूरप्रमाणे समोरच्याचे संरक्षण काढून घ्यायला सांगतात. त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

संबंधित व्हिडीओ