जळगावमध्ये बंडखोरी बाबत घेण्यात आलेली महायुतीची तातडीची बैठक अवघ्या काही वेळात संपली मात्र बैठकीनंतरही जळगावमधील बंडखोरीचा सस्पेन्स कायम आहे.बैठकीला शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील उपस्थित नसल्याने बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांच्या निवडणुकीतून माघारी बाबत अद्याप तोडगा नाहीच.सुमारे 30 मिनिटे चाललेल्या बैठकीत मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण स्मिता वाघ यांच्यासह शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, अमोल पाटील, चंद्रकांत सोनवणे ज्यांची उपस्थिती होती.