KEM रुग्णालयातील विद्यार्थिनी सेजल पवारवर निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती मिळतीय..प्रणित मोरे कॉमेडी शोमध्ये केलेलं वक्तव्य डॉ. सेजल पवारला चांगलंच भोवणार आहे.. अवयवदान करणाऱ्यांच्या मृतदेहासंबंधी प्रणित मोरेच्या शोमध्ये डॉ. सेजलने आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. या वक्तव्यांची महाविद्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यिय समिती नेमण्यात आलीय. ही समिती आज रात्रीपर्यंत आपला अहवाल देणार असून त्यानंतर कारवाईचं स्वरूप स्पष्ट होणार आहे.