Dhule Solapur मार्गावर स्वाभिमानीचं आंदोलन, दुष्काळग्रस्तांना हेक्टरी 50 हजारांची मदत देण्याची मागणी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग m अडवत रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. ऊसाला पहिलीची उचल चार हजार रुपये द्या व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. या अगोदर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखानदारांना इशारा दिला होता पण कारखानदारांनी त्यांची दखल न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या महामार्गावरील बेमुदत रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. सोलापूर येथील आंदोलन संपदाच राजू शेट्टी देखील या आंदोलनात सहभागी होणार असून जोपर्यंत प्रशासन व जिल्हाधिकारी घटनास्थळी येऊन उसाची पहिली उचल व दुष्काळी उपाय योजना जाहीर करत नाही तोपर्यंत हा आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर त्यांनी केला आहे याच आंदोलनाचा आढावा घेतला आहे आमचे धाराशिव चे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी

संबंधित व्हिडीओ