अजित पवार यांच्या दुर्घटनेप्रकरणी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करणाऱ्या रोहित पवारांना नवनीत राणा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.. रोहित पवारांनी स्वतःला सांभाळावं, नाहीतर उपचारासाठी जावं लागेल, अशी टीका राणा यांनी केली... शरद पवार यांनी या घटनेला दुर्घटना म्हटलं, तर सुप्रिया सुळेही यावर भाष्य करत नसल्याचं त्यांनी सांगितलंय.. त्याचबरोबर रोहित पवार कोणत्या पातळीचं राजकारण करत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.