पुण्यातल्या जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात आंदोलनही केलं. पण यामध्ये भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचं आंदोलन चांगलंच चर्चेत आलं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुद्द्यावरून पुणे भाजपमधला विसंवाद चव्हाट्यावर आला.