2013 पासून अजूनपर्यंत TET उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची जाणार नोकरी, 21 एप्रिलपर्यंत मागवली माहिती

शालेय शिक्षण विभागाच्या 13 फेब्रुवारी 2013 पासून शिक्षक भरती झालेले उमेदवार टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.तरीपण काहींना तीन, पाच संधीच्या अटीवर मान्यता दिलेल्या आहेत.या पार्श्वभूमीवर ३० मार्च २०१९ पर्यंत संबंधित शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारकच आहे.त्यानंतरही किती शिक्षक टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत,याची माहिती शालेय शिक्षण विभागाने तातडीने मागवली.यात टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांच्या नोकरीवर कायमचे गंडातर येऊ शकते, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित व्हिडीओ