प्रहार संघटना आणि शिक्षक 18 जुलैला विधानभवनाबाहेर आंदोलन करणार आहे.निवडणूक आणि जनगणनेचे काम शिक्षकांसाठी अनिवार्य आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी गेल्या आठवड्यात स्पष्ट केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर मतदानाच्या अतिरिक्त कामासाठी नेमणूक केलेल्या शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे... या कामामुळे शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून विद्यार्थ्यांच्या अध्यापनावरही परिणाम होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे... शासनाच्या या निर्णयाविरोधात येत्या १८ जुलै रोजी प्रहार शिक्षक संघटनेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे... तसेच, त्यांनी सुचविलेल्या मुद्द्यांचा विचार करण्याची मागणी आंदोलनात करण्यात येणार आहे.