Wardha जिल्ह्यात तापमानात घट, उकाडा कायम; Nashik मध्ये तापमानाचा पारा चाळिशीपार

वर्धा जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असल्याने तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी 46 अंशांच्या पुढे गेलेले तापमान सध्या 42 ते 43 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे... मात्र ढगाळ वातावरण असले तरी उकाडा कायम असून ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जनजीवनावर होत असल्याचे चित्र आहे. नाशिक शहरात पुन्हा एकदा कमाल तापमानाने उसळी घेतलीय. काल तापमानाचा पारा चाळिशीपार गेलाय. दिवसभर तीव्र सूर्यकिरणांचा चटका अन् रात्री घामाघूम करणारा असह्य उकाडा सध्या नाशिककर अनुभवत आहेत. पुढील दोन ते तीन दिवस उन्हाच्या तीव्रतेचा सामना नागरिकांना करावा लागू शकतो.

संबंधित व्हिडीओ