टीईटी परीक्षेचा पेपर तब्बल दीड कोटी रुपयांना विकला जाणार होता, अशी धक्कादायक माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक दुधे यांनी भिवंडी येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणी तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना भिवंडीतील कोनगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. तर या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली...मुख्यआरोपीच्या शोधासाठी 20 अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आलीय...ठाण्यातील भिवंडी येथील काही जणांकडून टीईटीचा हा पेपर विक्री करण्यात येणार होता. याबाबत ठाणे पोलिसांनी भिवंडी येथे पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.टीईटी पेपरफुटीप्रकरणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली. तर टीईटी पेपरफुटीप्रकरणावर अमित ठाकरेंची पोस्ट केली आहे.