भाजपसोबत दूरावा वाढत असताना रवींद्र धंगेकर यांनी ठाकरे आणि शिंदेंबाबत मोठा दावा केलाय. भविष्यात दोघेही एकत्र येतील असं मत त्यांनी व्यक्त केलंय.. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बाळासाहेबांचे रक्ताचे वारसदार आहेत. तर एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे वैचारिक वारसदार आहेत. तेव्हा या दोघांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावं अशी इच्छा रवींद्र धंगेकरांनी व्यक्त केलीय. धंगेकरांच्या या वक्तव्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी याला विरोध दर्शवलाय. धंगेकरांकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचं किशोरी पेडणेकरांनी सांगितलं.