ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचा मोबाईल फोन हॅक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सॲप स्टेटसवर अश्लील व्हिडिओ प्रसारित झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, स्टेटसवर अपलोड झालेले व्हिडिओ हटवण्यातही अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेण्यात आली असून सायबर सेलमार्फत तपास सुरू करण्यात आला आहे. या हॅकिंगमागे नेमके कोण आणि काय कारण आहे, याचा शोध घेतला जात आहे.