Mumbai-Pune Expressway चा परिसर झाला असता बेचिराख, पेरूच्या झाडाच्या खुट्टीने वाचले हजारोंचे प्राण

नुकत्याच मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीने तब्बल ३२ तास हजारो प्रवासी महामार्गावर अडकून राहिले होते.या वाहतूक कोंडीमागे दडलेला धोका आणि टळलेली भीषण दुर्घटनेची माहिती हळूहळू समोर येत आहे.अपघातानंतर टँकरमधून वायूची गळती सुरू झाली.अपघातानंतर टँकर चालकाने हाताने वायू गळती थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याचे दोन्ही हात भाजले.मदतकार्यादरम्यान घेतलेला एखादा चुकीचा निर्णय अनेकांच्या जीवावर बेतू शकला असता.गळती रोखण्यासाठी तज्ज्ञांनी पेरूच्या झाडाच्या लाकडापासून बनवलेली खुट्टी वापरण्याचा निर्णय घेतला.या टँकरमध्ये तब्बल २२ टन प्रोपोलिन वायू वाहून नेला जात होता.तो ज्वलनशील पदार्थांच्या संपर्कात आल्यास मोठा स्फोट होऊ शकतो.जर स्फोट झाला असता तर १० किलोमीटरपर्यंतचा परिसर उद्ध्वस्त झाला असता आणि संपूर्ण घाट भाग धोक्यात आला असता.एका साध्या दिसणाऱ्या पेरूच्या झाडाच्या खुट्टीमुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले.

संबंधित व्हिडीओ