विधानसभेतून निवडून द्यायच्या विधानपरिषदेतल्या अकरा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. त्यानुसार पंचवीस जून पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. आणि बारा जुलै रोजी मतदान आणि, आणि त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होईल. या निवडणुकीत अकरा पैकी नऊ जागा जिंकण्याचं उद्दिष्ट महायुतीने ठेवलेलं असतानाच शिंदे गट आणि अजित पवार गटातील नाराज आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जाऊ शकतो.