एकीकडे पुण्याचे पालकमंत्री म्हणतात पुण्यातली कोयता गँग, गुन्हेगारी संपली पाहिजे.पण त्याचवेळी ते गुन्हेगारांना तिकीट देतात, हे अजित पवारांच्या कुठल्या तत्वात बसतं.... असा सवाल केलाय भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी.मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांवर ही टीका केल्यानंतर पुण्यातला मोहोळ विरुद्ध अजित पवार हा संघर्ष आणखी वाढणार आहेच..... पण मूळ मुद्दा असा की अजित पवारांनी गुंडांना तिकीटं का दिली..... हा प्रश्न जेव्हा अजित पवारांना थेट विचारण्यात आला... त्यावेळी अजित पवारांनी थेट छे, तो मी नव्हेच.... अशी भूमिका घेतली. पाहुया नेमकं काय घडलं.