राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी NDTV मराठीच्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मराठवाड्यावर आलेले दुष्काळाचे संकट दूर व्हावे आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, असे साकडे त्यांनी गणरायाला घातले. राजकीय घडामोडींवर बोलताना तटकरे म्हणाले की, आगामी विधान परिषद निवडणुकीत कोणता पक्ष कोणती जागा लढवणार याबाबत महायुतीत चर्चा होईल, त्यानंतरच जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल. तसेच आगामी पक्ष अधिवेशन, संघटनात्मक विस्तार आणि इतर राजकीय मुद्द्यांवरही चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता, पुढील काळात त्यावर चर्चा होऊ शकते, मात्र सध्या तातडीने विस्ताराची कोणतीही चर्चा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
No discussion on cabinet expansion for now; Sunil Tatkare prays to Lord Ganesha for the shadow of drought to lift.