सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरमध्ये विजय मिळवला असला तरी, त्यांच्या घरातील सदस्यांना साताऱ्यात पराभव पत्कारावा लागला आहे.माळशिरसच्या निकालावर भाष्य करताना माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेला होता, अशी धक्कादायक माहिती मंत्री गोरे यांनी दिली...खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जयकुमार गोरे यांच्यावर गुंड म्हणत टीका केली होती, त्यावरून गोरे यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.