आता राज्यात नव्याने 65 तालुका बाजार समित्या होणार आहेत.मुख्यमंत्री बाजार समिती योजने अंतर्गत पणन मंडळामार्फत बाजार समितीची स्थापना होणार. राज्यातील एकूण ६८ तालुक्यांमध्ये बाजार समित्या अस्तित्वात नाहीत.त्यापैकी मुंबई उपनगरातील कुर्ला, अंधेरी आणि बोरिवली हे तालुके वगळून उर्वरीत 65 तालुक्यांमध्ये बाजार समिती स्थापन होणार. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत प्रत्येक बाजार समितीला किमान पाच एकर तर अन्य जिल्ह्यांतील बाजार समित्यांना किमान 10 ते 15 एकर जागेची गरज लागेल.ज्या तालुक्यात उपबाजार आवार आहेत, त्यांचे मुख्य कृषी बाजार समितीत रुपांतर करण्यात येणारेय.