खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मोठी घोषणा केलीय. यापुढे कोणतीही निवडणूक ही पवार विरुद्ध पवार अशी होऊ देणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. महाराष्ट्रात 2024 मध्ये पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातीलच दोन सदस्य एकमेकांच्या विरोधात लढले होते. लोकसभेची निवडणूक जास्त चुरशीची ठरली होती. पण आता यापुढे पवार विरुद्ध पवार निवडणूक होऊ देणार नसल्याचं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. यावर सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय पाहुयात.