ही दृश्य पाहून तुमचा थरकाप उडेल...जेजुरीच्या वारीतील ट्रक अपघाताची हृदय पिळवटून टाकणारी दृश्य

मन हेलावणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी बातमी... विठूरायाच्या भेटीसाठी टाळ-मृदंगाच्या ठेक्यात, अभंग गात निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातलाय. पुण्याच्या जेजुरीजवळ ही दुर्घटना घडलीय. वारीतल्याच एका ट्रकने वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. त्यात तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 10 वारकरी जखमी झालेत. मृतांमध्ये राजश्री भोसले, माधवी सरवडे आणि नंदा पवार यांचा समावेश आहे. हा अपघात मोबाईल कॅमेरात कैद झालाय.

संबंधित व्हिडीओ