उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावर शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर 'हा मोर्चा आगामी स्थानिक निवडणुका लक्षात घेऊन राजकारण करण्यासाठी' काढला आहे, असे भुमरे यांनी म्हटले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले.