पालघरच्या नवली परिसरात दोन घरांच्या भिंतींमधील अत्यंत अरुंद जागेत 70 वर्षीय वृद्ध अडकल्याची धक्कादायक घटना घडली. विनोद विष्णू जाधव हे अवघ्या एक फुटापेक्षाही कमी जागेत अडकल्याने त्यांची सुटका करणे मोठे आव्हान बनले होते. मात्र अग्निशमन दलाने प्रसंगावधान राखत भिंत फोडून मार्ग तयार केला आणि जाधव यांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पालघर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.