Tiger Shroff गोळीबार प्रकरण | गुप्त App द्वारे अनिल- प्रांजलचा संपर्क; प्रांजल ठकरालला पोलीस कोठडी

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी मोठी माहिती समोर आलीय.मुख्य सूत्रधार अनिल पंडितचा खास असलेला प्रांजल ठकराल हा 'डिप्लोमा इंजिनिअर' असल्याचं समोर आलंय... टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा संपूर्ण कट अनिल पंडितने रचला होता, तर तो प्लॅन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रांजल हा त्याचा महत्वाचा दुआ होता... अनिल आणि प्रांजल हे दोघे रोज एका विशिष्ट सिक्रेट ॲपच्या माध्यमातून संपर्कात होते, जेणेकरून पोलिसांना त्यांचे लोकेशन ट्रेस करता येऊ नये...या कटासाठी लागणारा पैसा, शूटर्सना मदत, लॉजिस्टिक... सगळी जबाबदारी प्रांजलवर होती...प्रांजलचा गुन्हेगारी इतिहासही मोठा आहे, यापूर्वी पानिपतमध्ये एका बड्या व्यावसायिकावर झालेल्या फायरिंगचाही कट अनिल पंडितच्या सांगण्यावरून रेहान अन्सारी आणि प्रांजलनेच रचला होता...प्रांजलला आज न्यायालयात हजर केले असता त्याला 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे...

संबंधित व्हिडीओ