मेळघाटातल्या आदिवासी नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी मेळघाटात संघर्ष यात्रा सुरु आहे. बच्चू कडू यांच्या संघर्ष यात्रेचा आजचा नववा दिवस आहे. बच्चू कडू आज उद्योग मंत्री उदय सामंत तसंच आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची दुपारी तीन वाजता भेट घेणार आहेत.. राज्य सरकारला बच्चू कडूंनी 4 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन कुठल्याही स्तरावर जाऊ शकतं असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय.