ऐन निवडणुकीच्या तोंडावर संभाजीनगरात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय. शिवसेनेचे माजी महापौर आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली. कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळत नसल्यानं हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितलंय. त्यानंतर जंजाळ कार्यकर्त्यांसह संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी पोहचले होते. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. दरम्यान संपूर्ण गोंधळानंतर संजय शिरसाट यांनी उद्यापर्यंत वाट पाहू अशी प्रतिक्रिया दिलीय.