दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास होतो त्यामुळे मुंबई शहरात घर द्या, अस पत्र उपमहापौर संजय घाडी यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पाठवलंय. मुंबई महापालिकेतील विविध बैठकांची वेळ गाठताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचं संजय घाडी म्हणालेत. त्यामुळे पश्चिम उपनगरातील दहिसरमध्ये राहणारे उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबईतील शहर भागातच निवासस्थान मिळावे अशी मागणी केलीय. राणी बाग परिसरातील अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त बंगल्यासाठी घाडी प्रयत्नशील आहेत. त्यावर काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणारय.