पिंपरी-चिंचवडमधील चोवीसवाडी येथील राम स्मृती सोसायटीत काल संध्याकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यादरम्यान लिफ्टमध्ये अडकून एका १२ वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी मुलाला बाहेर काढले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लिफ्टमधील बिघाडाचा तपास सुरू आहे.