Jalgaon नशिराबाद शिवारात ट्रान्सफॉर्मरला आग,शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित;नजीकची झाडंझुडपंही जळून खाक

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद शिवारात महामार्गालगत असलेल्या विद्युत रोहित्राला अचानक आग लागल्याची घटना घडली असून आगीत रोहित्र पूर्णपणे जळून गेल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच या आगीमुळे परिसरातील झाडेझुडपे जळाली असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले मात्र, ऐन शेतीकामाच्या काळात वीज पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.दरम्यान, वाढत्या तापमानामुळे रोहित्रावर विजेचा ताण वाढल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे…

संबंधित व्हिडीओ