पुढच्या महिन्यात मे पर्यंत समृद्धीचा शेवटचा टप्पा खुला होणारेय. त्यामुळे मुंबई ते नागपूर केवळ 8 तासांचा प्रवास शक्य होणारेय. समृद्धीचा शेवटचा टप्पा खुला झाल्यानंतर नागपूरहून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर पोहोचणे शक्य होईल. तसेच हा संपूर्ण 701 कि.मी.चा महामार्ग सेवेत दाखल होईल. विधानसभा निवडणुकीपूर्वी याचा इगतपुरी ते आमने हा शेवटच्या टप्प्यातील मार्ग खुला केला जाणार होता. मात्र या टप्प्यात अभियांत्रिकीच्या दृष्टीने किचकट असलेल्या खर्डी येथील पुलाचे काम बाकी होते.