पंढरपूर वारीसाठी निघालेल्या दिंडीवर काळाने घाला घातला आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातल्या दिघंची परिसरात भरधाव ट्रक दिंडीत घुसल्याने एका महिला वारकरीचा मृत्यू झाला आहे, तर चार वारकरी जखमी झाले आहेत. नागिनी कोळी असे मृत महिलेचे नाव आहे. पहाटेच्या सुमारास माने वस्ती परिसरात हा अपघात घडला. जखमींवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून आटपाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.