दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी शेतकऱ्यांना आपुलकीचा सल्ला दिलाय. दुष्काळाकडे केवळ एक समस्या म्हणून न पाहता त्यात नवीन संधी शोधल्या पाहिजेत, असं तुकाराम मुंढेंनी म्हटलंय..पिंपरी-चिंचवड येथे आयोजित ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पोमध्ये बोलताना त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. कोणत्याही संकटात खचून न जाता भविष्याचा विचार करून शेतीसोबतच व्यवसायाचे नवे मार्ग शोधले पाहिजेत, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.