महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराला लवकरच पुरातन झळाळी प्राप्त होणार आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या वेगात सुरु आहे. भावनिक आणि पुजारी बांधवांची सुद्धा चांगलीच तयारी सुरू असलेली पाहायला मिळते आहे. मंदिरातील दत्त मंदिराच्या कामालाही आता सुरुवात झालेली आहे.