Satara ZP वादावरून Shinde गटातच दोन गट, महेश शिंदेंवर पक्षातले इतर आमदार नाराज

साताऱ्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या प्रकरणावरून शिंदे गटातच 2 गट पडल्याचं चित्र निर्माण झालंय साताऱ्याच्या कोरेगावचे आमदार महेश शिंदेंवर पक्षातले इतर आमदार नाराज असल्याची माहिती समोर आलीय सातारा प्रकरणाच्या शिंदेंच्या पक्षाची आज विधानभवनात बैठक झाली या बैठकीलाही महेश शिंदे गैरहजर होते तर विधानभवनाच्या पायऱ्यांवरील आंदोलनावेलळीही महेश शिंदे गैरहजर असल्याने इतर आमदार नाराज आहेत, महेश शिंदे यांच्या भूमिकेवरून सवाल उपस्थित होतायत. विधानभवन परिसरात देखील भाजप नेते जयकुमार गोरे आणि महेश शिंदे यांची गळाभेट झाल्याने आता चांगल्याच चर्चा होतायत.

संबंधित व्हिडीओ