अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी उद्या मतदान होणार आहे. त्यासाठी मतदानाच्या पूर्वसंध्येला अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू एकत्र पाहायला मिळाले.. राजकारणातील दोन कट्टर वैरी म्हणून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्याकडे पाहिल जात, बच्चू कडू आणि रवी राणा यांनी हँडसेक घेत काही वेळ चर्चा सुद्धा केली...या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच रवी राणा आणि बच्चू कडू यांनी शिक्षकांना किरण सरनाईक यांच्यासाठी मतं मागितले... दोघे कट्टर राजकारणी एकत्र आल्याने राजकीय क्षेत्रामध्ये चर्चाला उधाण आलं आहे.