विधानसभेसाठी उभाठा गटानं आता कंबर कसली आहे मन विधानसभा हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून नियोजन केलं जातंय. उद्यापासून आदित्य ठाकरेंचा विधानसभा निहाय दौरा सुरू होणार आहे. कर्जत आणि उरण पासून या दौऱ्याची सुरुवात केली जाणार आहे. लोकसभेच्या निकालानंतर आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीकडून आता विधानसभेसाठी तयारी सुरू झाल्याचं दिसून येतय.