...त्यांना पक्षच कळला नाही, पक्षांतर्गत बंडखोरी करणाऱ्यांचा Uday Samant यांच्याकडून खरपूस समाचार

जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्ह्यात पक्षांतर्गत बंडखोरी करणाऱ्यांचा खरपूस समाचार पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे. ज्यांनी बंडखोरी केली आहे, ते सर्व अवघ्या दोन-तीन महिन्यांपूर्वी पक्षात आलेले लोक आहेत. नव्याने आलेल्या लोकांनी पक्षात बंडखोरी केली आहे. त्यामुळे पक्षाशी ते किती प्रमाणिक होते, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. जे पहिल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत निष्ठेने उभे आहेत, अशा एकाही व्यक्तीने बंडखोरी केलेली नाही." कोकरे जिल्हा परिषद गटातील किशोर घाग यांच्या बंडखोरीचा उल्लेख करत सामंत यांनी स्पष्ट केलं की, ज्यांना पक्षाची विचारधाराच समजली नाही, त्यांनीच ही पावले उचलली आहेत. माझ्या मतदारसंघातही जी बंडखोरी झालेली आहे, ते निवडणुकीनंतरच कळेल काय व्हायचं ते, ते देखील नव्याने आलेले आहेत, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं..

संबंधित व्हिडीओ