रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबतचा वाद अद्यापही कायम आहे अशातच महायुतीत नाराजीनाट्य सुरु असल्याची चर्चा आता रंगू लागलीय.. शिवसेना मंत्र्यांच्या फायलींना अर्थखात्याकडून पुरेसा प्रतिसाद दिला जात नसल्याची देखील माहिती समोर येतेय. याबात उपमुख्यमंत्री शिंदेंनी अमित शाहांकडे तक्रार केल्याची माहिती मिळतेय. शिंदे यांनी काल पुण्यात अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अर्थखात्याबाबत अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान यावर अजित पवारांनीदेखील प्रतिक्रिया दिलीय. मला अमित शाह असं काही बोलले नाहीत. मी शाह यांच्यासोबत सकाळपासून ते त्यांचं विमान मुंबईसाठी टेकऑफ होत नाही तोपर्यंत होतो. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोबत होते असं अजित पवार म्हणालेत.