Ujani Dam नं गाठला तळ, पाणीसाठी वजा 0.06 टक्क्यांवर; धरण परिसरातून घेतलेला NDTV ने घेतलेला आढावा

पुणे, सोलापूर, नगरसाठी जीवनदायनी ठरलेल्या उजनी धरणाने तळ गाठलाय.आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाचा पाणी साठा वजा 0.06 टक्क्यांवर गेलाय.उजनी धरणात साठवण क्षमतेच्या एकूण 63. 62 इतका पाणीसाठा आहे.उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ही 123 टीएमसी इतकी आहे. जेव्हा उजनी धरण 100 टक्के क्षमतेने भरतं तेव्हा उजनी धरणात 117 टीएमसी इतका पाणीसाठा मावते.त्यापैकी 54 टीएमसी पाणीसाठा हा जिवंत पाणीसाठा म्हणून ग्राह्य धरला जातो तर उर्वरित 63 टीएमसी पाणीसाठा हा मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो आज ही पाणीसाठा 63 टक्क्यांच्या खाली म्हणजे मृत साठ्यात गेलाय.

संबंधित व्हिडीओ