युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मोठा दावा केला.त्यांनी रशिया युक्रेनविरुद्धच्या युद्धात ४७ देशातील नागरिकांना भुलवून आपल्या सैन्यात भरती करत असल्याचा आरोप केला, यात भारतातील लोकांचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलंय. झेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्रांसमोर इतर देशांना आपल्या नागरिकांनी या युद्धापासून दूर ठेवण्याचं आवाहन केलं. दरम्यान, आजवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या नुसार, रशियन सैन्यात २२७ भारतीय नागरिकांची भरती झाली होती. त्यापैकी ५१ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १३९ जणांना सैन्यातून मुक्त करण्यात आले आहे. उर्वरित भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकार रशियाशी चर्चा करत आहे.