भारताच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना रक्षाबंधनला बहिणीचे प्रेम मिळावा यासाठी एक लाख राख्या शिर्डीतून जम्मू-काश्मीरकडे रवाना झाल्यात.. कोपरगावच्या संजवनी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून हा अनोखा उपक्रम राबवला जातो.. यंदा ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर याला व्यापक स्वरुप देण्यात आलय.. आज शिर्डीच्या साई मंदिरात राखी तसेच रक्षारथाचं पुजन करून जम्मू-काश्मीरच्या सीमेकडे रवाना झाला असून रक्षाबंधनाच्या आधी हजारो सैनिकांपर्यंत या राख्या पोहोचतील... याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी.